Posts

Showing posts from March, 2020

'हिरवाई- डॉ. शरदिनी डहाणूकर

Image
आजचे पुस्तक आहे 'हिरवाई '. हे पुस्तक डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिले आहे. डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या मुंबईच्या शेठ जी .एस .मेडिकल कॉलेजमध्ये औषधविज्ञान (Allopathy ) विभागात प्राध्यापक होत्या. पण तरीही आयुर्वेदाविषयी आणि त्यातील उपचारपद्धतींबद्दल त्यांनी विशेष अभ्यास केला आणि PhD (डॉक्टरेट ) सुध्दा प्राप्त केली. साचेबद्ध विषयाचा अभ्यास न करता वेगवेगळया  प्रकारे त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन आणि संशोधन केले. ह्या पुस्तकातील काही लेख  लोकप्रभा मध्ये प्रसिद्ध झालेले होते . त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रातून, आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून  प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक पुस्तके  देखील विशेष उल्लेखनीय आहेत. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केले आहे.        हे पुस्तक आपल्याला मुंबई मधील काही वृक्षसंपदेची ओळख करून देते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात अशी अनेक दुर्मिळ, दुर्लक्षित झाडे आहेत ज्याची कदाचित आपल्याला जाणीव नाही किंवा माहिती नाही . अशा अनेक वृक्षांची ओळख लेखिका सुंदरपणे करून देते. वृक्षांची अशी माहिती देताना त्याचे ग...

नक्षत्रवृक्ष- डॉ. शरदिनी डहाणूकर

आजचे पहिले पुस्तक मी निवडले आहे ' नक्षत्रवृक्ष '. हे पुस्तक डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिले आहे. डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या मुंबईच्या शेठ जी .एस .मेडिकल कॉलेजमध्ये औषधविज्ञान (Allopathy ) विभागात प्राध्यापक होत्या. पण तरीही आयुर्वेदाविषयी आणि त्यातील उपचारपद्धतींबद्दल त्यांनी विशेष अभ्यास केला आणि PhD (डॉक्टरेट ) सुध्दा प्राप्त केली. साचेबद्ध विषयाचा अभ्यास न करता वेगवेगळया  प्रकारे त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन आणि संशोधन केले. ह्या पुस्तकातील काही लेख  लोकप्रभा मध्ये प्रसिद्ध झालेले होते . त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रातून, आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून  प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक पुस्तके  देखील विशेष उल्लेखनीय आहेत. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केले आहे.       ह्या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की  हे पुस्तक ' नक्षत्र आणि त्याचा आराध्यवृक्ष ' ह्यांच्याशी निगडित आहे. जन्म नक्षत्रावरून प्रत्येक राशीचा  एक आराध्य वृक्ष असतो. पंचांगामध्ये आपण पाहिले  तर कोष्टकात (अवकहडा चक्र)  ह्या...

माणूस आणि झाड - निळू दामले

Image
माणूस आणि झाड - निळू दामले आजचे पुस्तक आहे 'माणूस आणि झाड' आणि ह्याचे लेखक आहेत निळू दामले.  लेखक निळू दामले हे पत्रकारिता, छायाचित्रण, चळवळी आणि द्रुकश्राव्य माध्यमात अनेक वर्षे काम केलेलं आहेत. ह्या निमित्ताने अनेक देशात विदेशात त्यांचे लोकांसोबत भेटणे , लोकजीवन जवळून पाहण्याचे काम असल्याने अनेक विषयात त्यांचे लिखाण आहे. त्यांची अनेक पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेली आहेत , जी विविध विषयानुसार आणि त्यावरील अभ्यासपूर्ण लिखाणाने प्रसिद्ध आहेत.                     हे छोटेखानी पुस्तक राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे. ह्या पुस्तकाबाबत सांगायचे म्हणजे अतिशय सोप्प्या भाषेत छान माहीत देणारे हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्येंत सर्वाना आवडेल असे आहे. वनस्पती म्हणजे काय , त्यांचं  काम कसं  चालतं , वनस्पतींची वाढ कशी होते, वनस्पतींमध्ये होत असणाऱ्यांना अनेक प्रक्रिया ह्यात अतिशय छान पद्धतीने सांगितल्या आहेत. लेखकाने अनेक उदाहरणें , काही किस्से आणि प्रसंग सांगत , वैज्ञानिक माहिती सहजपणे आपल्यास...
आज आपल्या सर्वाना मी एक छोटीशी माहिती देणार आहे. आपण सगळेच झाडांबाबत जागरूक आहोत किंवा झाडे लावणे त्याची काळजी घेणे ह्याबाबत. ....! ते गरजेचे आहेच पण त्यासोबत आपण आपली ही आवड आपल्या पुढच्या पिढीमध्ये  सुद्धा  निर्माण करत आहोत का? ह्याबाबत थोडासा विचार आपण प्रत्येकाने  करावा.  काय करू शकू आपण हि आवड मुलांमध्ये किंवा पुढच्या पिढीमध्ये निर्माण करण्याकरता....??? ह्या संदर्भात एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते. दरवर्षी, मुंबई पुणे आणि महाराहस्त्रातील इतर काही भागात, तसेच इतर काही राज्यात जसे गुजराथ, कर्नाटक आणि काही देशातही डिसेंबर महिन्यापासून किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विविध फळभाज्या, फुले, वनस्पती (सर्व प्रकारच्या देशी आणि विदेशी) यांचे प्रदर्शन भरवले जाते. त्यात अनेक विविध वनस्पती, फुले फळे, भाज्या बघायला मिळतात. काही ठिकाणी तर रोपवाटिकांचे स्टॉल्स असतात जिथे तुम्हाला अतिशय कमी आणि माफक दरात तुमच्या आवडीची झाडे विकत घेता येतात. मुंबई मध्ये अशी प्रदर्शने नुकतीच झाली. ह्यात अनके संस्था सहभागी होतात. तसेच महानगरपालिकांद्वारे देखील असे उपक्रम राबवले जात...

वनस्पती आणि त्यांच्यातील संवाद

वनस्पती आणि त्यांच्यातील संवाद वनस्पती आणि संवाद...... ???? ऐकून चकित झालात  ना.... !!!! पण हे  खरं आहे . आज तुम्हाला मी त्या संदर्भातच माहिती देत आहे. वनस्पतींबाबत अनेक विषयाचे वाचन केले जाते कारण  मी मुळातच वनस्पती विषयातील अध्यापक आहे. ही  माहिती एका वन अभ्यासकाच्या अनुभवातून त्याने मांडलेली आहे. वनस्पतींचा अभ्यास करताना त्याने काही घटना पहिल्या आणि त्याची नोंद ठेवून त्याने हा निष्कर्ष काढला की वनस्पती सुद्धा संवाद साधतात. परंतु, हा संवाद आपल्यासारखा खऱ्या संवादातून होत नाही तर त्यांच्या काही ठराविक माध्यमातून केला जातो. आपल्या सर्वाना माहित आहे की संवाद हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. वनस्पती त्यांचा संवाद वास, चव आणि रासायनिक घटकांच्या स्रवण्यातून करतात.                वनस्पतींना कोणाशी , केव्हा आणि कसा संवाद साधायचं हे सुद्धा कळते. वनस्पतींच्या  संपर्कात येणाऱ्या कीटक, प्राणी किंवा इतर पक्षी ह्याच्याशी त्यांचा असणारा संवाद प्रत्येकवेळी वेगळा असतो. एखादा किटक वनस्पतीच्या जवळ आला असता त्याच्या ल...