Posts

आपली बाग निरोगी ठेवण्याचे सोप्पे मार्ग:

Image
आपली बाग निरोगी ठेवण्याचे सोप्पे मार्ग: आपल्या बागेत घडणा-या सर्वात रहस्यमय गोष्टींपैकी एक म्हणजे जेव्हा एखाद्या वनस्पतीला रोग होतो. हे कसे घडले? त्याचा प्रसार होईल? माझी सर्व झाडे मरतील काय? मी यातून मुक्त कसे होऊ शकतो? रोगाच्या प्रतिबंधाबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोग रोग उद्भवण्याची कारणे शोधून काढणे. आपल्याकडील वनस्पती जिला रोगबाधा होऊ शकते, एक रोगकारक (बुरशी, बॅक्टेरियम किंवा विषाणू इ.) वनस्पतीवर हल्ला करू शकणारे जैविक घटक आणि पर्यावरणीय परिस्थिती (आर्द्रता किंवा दुष्काळ यासारखी) की ज्यामुळे रोगाचा प्रसार होऊ शकतो. यापैकी कोणतीही एक अस्तित्त्वात नसल्यास, रोग होणार नाही, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करताना ह्या तीन गोष्टी नीट लक्षात घेऊन उपाय योजना करावी. बागेत अडचणी येण्याची वाट पाहण्याऐवजी, रोगापासून बचाव करण्याचा उत्तम मार्ग शोधला पाहिजे. 1. खरेदी करण्यापूर्वी झाडे काळजीपूर्वक तपासा- चांगली मुळे आणि खराब मुळे आपल्याला ओळखता आली पाहिजेत. सर्वात कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे निरोगी वनस्पती कशा असाव्यात हे आपणास माहित असले पाहिजे. वनस्पती आजारी आहे की नाही हे माहित करणे कठी...

शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर

Image
शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर अनेक झाडे बहुपयोगी असतात. देशी झाडांमध्ये वड, पिंपळ अशी झाडे शतायुषी असतात; म्हणजेच ती दीर्घ काळ उभी असतात. या झाडांची व त्याभोवतालच्या पर्यावरणाची माहिती रूपाली पारखे-देशिंगकर यांनी ‘शतायुषी’ या पुस्तकामधून दिली आहे. याची सुरुवात अर्थातच बहुगुणी वडापासून होते. वडाभोवती गुंफलेली सत्यवान-सावित्रीची कथा सांगून, त्याचे कार्य, वनस्पतीशास्त्रीय नाव, विविध जाती, उपयोग, धार्मिक कार्यातील महत्त्व, औषधोपचारांसाठी उपयोग आदी माहिती पुस्तकात दिली आहे. महावृ क्ष वडानंतर बोधिवृक्ष पिंपळ, शंभर टक्के भारतीय औदुंबर अर्थात उंबर, शिस्तबद्ध पद्धतीने वाढणारा आणि आकर्षक फुलांचा कदंब, हिरव्यागार पानांचा आणि गर्द जांभळ्या रंगारी टपोरी फळे धरणारा जांभूळवृक्ष, ताडमाड वाढणारा सरदार ताड, नाजूक सुगंधी फुलांचा बकुळवृक्ष, लोकांच्या जीवनाशी जोडलेला मोह, फळांचा राजा आंबा, वरून काटेरी पण आत मऊ गोड गरे असणारा फणस, तसेच करंज, चिंच, गोरखचिंच अशी दीर्घायुषी झाडांची सळसळ शब्दरूपाने या पुस्तकातून आपल्याला वाचता येते. प्रत्येक झाडाची छायाचित्रेही अत्यंत आकर्षक असल्याने सजावटही खुलून दिसते...
Image
आजच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ही खास माहिती आपल्या सभासदांसाठी...!! बागकाम ही ग्राफिटी तर जमीन कॅनव्हास- अंजली श्रोत्रिय ,चतुरंग,लोकसत्ता घरासमोरच्या ‘नेचर-स्ट्रिप’मध्ये शेती करून लोकांना ‘फास्ट-फूड’च्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी चळवळ उभारणाऱ्या, मुलांना निसर्गात रमायला लावणारा, वाळवंटाचं नंदनवन करत, ताज्या फळ-भाज्यांचं महत्त्व पटवून देणाऱ्या अमेरिकेतल्या रॉन फिनले या अवलियाविषयी.. कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी। असं म्हणणाऱ्या सावता माळ्याला आपल्या मळ्यात, मातीत उगवणाऱ्या फळांत, भाजीत विठोबा दिसला. त्यांनाच आपला देव मानणाऱ्या सावता माळ्यासारखाच एक अवलिया आहे रॉन फिनले, पण थेट अमेरिकेत. आपल्या मातीत फळभाज्या पिकवून निसर्ग जोपासत त्याला चळवळीचं रूप देणारा. मुलांना, तरुणांना शेतीकडे वळवत ‘गँगस्टर गार्डनर’ तयार केलेल्या या रॉनलाही ‘अवघी विठाई माझी’चा साक्षात्कार झालेला आहे. रॉन अमेरिकेतील लॉस एंजेलिस (एल.ए.)मध्ये राहतो. बहुतेकांना ऐकून, वाचून किंवा प्रत्यक्ष जाऊन ते माहिती आहे. एल.ए. म्हटलं की, हॉलीवूड आणि तिथला झगमगाट डोळ्यांपुढे येतो. पण तिथला सगळाच भाग असा श्रीमंत नाही. त...

फुलवा - डॉ. श्रीश क्षीरसागर

Image
आज मी ओळख करून देत आहे डॉ. श्रीश क्षीरसागर यांच्या आणखी एका अतिशय सुंदर पुस्तकाची...!!!  पुस्तकाचे नाव ' फुलवा '.            हे पुस्तक आपल्याला विविध फुलझाडांची माहिती  देणारे आहे. लेखकाने ह्या पुस्तकात एकूण ४७ फुल झाडांची माहिती देताना त्याचे  सुंदर फोटो सुद्धा दिले आहेत. हे पुस्तक 'सृजन  प्रकाशन, नाशिक '  ह्यांनी प्रकाशित केले आहे. लेखकाने २०००४ साली लोकसत्ता मध्ये फुलांवर सदर लिहिण्यास सुरवात केली आणि त्यातील लेखमाला लोकांच्या पसंतीस उतरली. हीच लेखमाला फुलवा नावाने लिहिली गेली आणि त्याचेच  हे पुस्तक...!!! अनकेविध फुलांची माहिती लेखकाने आपल्या सहज सुंदर भाषेत देताना अनेक काव्यपंक्तीचा चपखल वापर केलेला आढळतो. पेशाने औषधी वैद्य असणाऱ्या लेखकाला, वनस्पतींचे सखोल ज्ञान आहेच पण त्यासोबत त्यांचे मराठी आणि संस्कृत भाषेतील प्रभुत्व सुद्धा आपल्याला लेखातून जाणवते. लालित्यपूर्ण भाषेतून माहिती देताना त्यातली शास्त्रीय माहिती सुद्धा अतिशय सोप्प्या आणि समजेल अशा भाषेत लेखकाने मांडली आहे, जेणेकरून हे पुस...

बहर - डॉ. श्रीश क्षीरसागर

Image
बहर - डॉ. श्रीश क्षीरसागर  आज मी ओळख करून देत आहे डॉ. श्रीश क्षीरसागर यांच्या एका अतिशय सुंदर पुस्तकाची...!!! पुस्तकाचे नाव ' बहर '. नावावरूनच आपल्याला लक्षात येते की हे पुस्तक आपल्याला विविध फुलांच्या बहराबाबत माहिती देणार आहे. लेखकाने ह्या पुस्तकात एकूण १२० झाडांची माहिती देताना त्याचे अतिशय सुंदर फोटो सुद्धा दिले आहेत. हे पुस्तक 'अक्षरमुद्रा प्रकाशन'  ह्यांनी प्रकाशित केले आहे. मित्रांसोबत गप्पा मारताना फुललेल्या झाडांबाबत बोलता बोलता जेव्हा लेखकाला जाणवलं कि अनेक  वनस्पतींबद्दल अजूनही लोकांना माहिती नाही. आपले राज्यपुष्प कोणते हे सुद्धा जेव्हा अनेकांना माहित नाही , हे पाहिल्यावर लेखकाने असे पुस्तक लिहावे असा विचार केल्याचे म्हंटले आहे त्याच्या मनोगतामध्ये...!!! (आपले महाराष्ट्राचे राज्यपुष्प 'ताम्हण' ह्या वनस्पतीचे आहे, हे मी इथे नमूद करते म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांना ते कळेल). कॅमेरा हातात आल्यावर लेखकाने असे अनेक वनस्पती आणि त्यांच्या बहराचे, फुलांचे अतिशय सुंदरपणे घेतलेले फोटो आपल्याला ह्याही पुस्तकात पाहायला मिळतात आणि नकळत आपण त्या पुस्तकाचे  व...

वनस्पतींसंबंधीची पुस्तके

ए फिल्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर) औषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक) कॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी) घरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड) ट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे) नक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर) निसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते) निसर्गभान (प्रा. श्री.द.महाजन) परसबाग (द.गो. मांगले) प्लॅंट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तिसरा, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे) फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर) बहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर) वनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे) सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे) सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी) सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले) हिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर) अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके :- गार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; ...

आसमंत- श्रीकांत इंगळहळीकर

Image
आजचे पुस्तक : आसमंत- श्रीकांत इंगळहळीकर. आज मी ओळख करून देणार आहे ती श्रीकांत इंगळहळीकर यांनी लिहिलेल्या 'आसमंत' या पुस्तकाची..!! हे पुस्तक 'करोला पब्लिकेशन, पुणे' यांनी प्रकाशितआहे. यामध्ये लेखकाने आपल्या आसपासच्या निसर्गाचे वर्णन अतिशय ओघवत्या भाषेत केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे निसर्गनिरिक्षणांवर आधारित असलेल्या लेखांचा संग्रह आहे. यातील काही लेख यापूर्वी 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये, साप्ताहिक सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. लेखकाने आपल्या या पुस्तकात लहा नपणापासून निसर्गाशी निर्माण होत गेलेले नाते सांगत अनेकविध अनुभव इथे सांगितले आहेत. लेखकाच्या मते 'आसमंत' आपल्या दाराशी सुरू होतो. आपण त्या आसमंतातील आविष्कार चौकसपणे, संवेदनाक्षम नजरेने पाहिले तर आपल्याला अनेक थक्क करणा-या गोष्टी दिसतात. निसर्ग आपल्याला निरागस आनंद तर देतोच, पण आपल्यातला अहंकार, ताण, मानसिक थकवा कमी करतो. आपण या विश्वासमोर किती क्षुद्र आहोत याची जाणीव करून देतो. असा अभ्यास करताना त्यातील विविधता लेखकाने आपल्या अनुभवातून आणि छायाचित्रातून ललित लेखन प्रकारातून मांडली ...