माणूस आणि झाड - निळू दामले

माणूस आणि झाड - निळू दामले
आजचे पुस्तक आहे 'माणूस आणि झाड' आणि ह्याचे लेखक आहेत निळू दामले. 

लेखक निळू दामले हे पत्रकारिता, छायाचित्रण, चळवळी आणि द्रुकश्राव्य माध्यमात अनेक वर्षे काम केलेलं आहेत. ह्या निमित्ताने अनेक देशात विदेशात त्यांचे लोकांसोबत भेटणे , लोकजीवन जवळून पाहण्याचे काम असल्याने अनेक विषयात त्यांचे लिखाण आहे. त्यांची अनेक पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेली आहेत , जी विविध विषयानुसार आणि त्यावरील अभ्यासपूर्ण लिखाणाने प्रसिद्ध आहेत. 
                   हे छोटेखानी पुस्तक राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे. ह्या पुस्तकाबाबत सांगायचे म्हणजे अतिशय सोप्प्या भाषेत छान माहीत देणारे हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्येंत सर्वाना आवडेल असे आहे. वनस्पती म्हणजे काय , त्यांचं  काम कसं  चालतं , वनस्पतींची वाढ कशी होते, वनस्पतींमध्ये होत असणाऱ्यांना अनेक प्रक्रिया ह्यात अतिशय छान पद्धतीने सांगितल्या आहेत. लेखकाने अनेक उदाहरणें , काही किस्से आणि प्रसंग सांगत , वैज्ञानिक माहिती सहजपणे आपल्यासमोर मांडलेली आहे. मराठीत अशी पुस्तके फार कमी आहेत , त्यातील हे एक अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण पुस्तक...!! गमती जमती सांगत दिलेली माहिती सर्वानाच आवडते, म्हंटल तर ह्या पुस्तकातून वनस्पतींचा अभ्यासच आहे पण गोष्टी आणि प्रसंगातून....!!! त्यामुळे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही अजिबात...!! आणि सखोल माहिती मिळत जाते हे वेगळंच.

Comments

Popular posts from this blog

वनस्पतींसंबंधीची पुस्तके

शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर

फुलवा - डॉ. श्रीश क्षीरसागर