'हिरवाई- डॉ. शरदिनी डहाणूकर

आजचे पुस्तक आहे 'हिरवाई '.

हे पुस्तक डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिले आहे. डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या मुंबईच्या शेठ जी .एस .मेडिकल कॉलेजमध्ये औषधविज्ञान (Allopathy ) विभागात प्राध्यापक होत्या. पण तरीही आयुर्वेदाविषयी आणि त्यातील उपचारपद्धतींबद्दल त्यांनी विशेष अभ्यास केला आणि PhD (डॉक्टरेट ) सुध्दा प्राप्त केली. साचेबद्ध विषयाचा अभ्यास न करता वेगवेगळया  प्रकारे त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन आणि संशोधन केले. ह्या पुस्तकातील काही लेख  लोकप्रभा मध्ये प्रसिद्ध झालेले होते . त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रातून, आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून  प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक पुस्तके  देखील विशेष उल्लेखनीय आहेत. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केले आहे.
       हे पुस्तक आपल्याला मुंबई मधील काही वृक्षसंपदेची ओळख करून देते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात अशी अनेक दुर्मिळ, दुर्लक्षित झाडे आहेत ज्याची कदाचित आपल्याला जाणीव नाही किंवा माहिती नाही . अशा अनेक वृक्षांची ओळख लेखिका सुंदरपणे करून देते. वृक्षांची अशी माहिती देताना त्याचे गुणधर्म, किंवा काही उपयोग सुद्धा ह्यात मांडलेले आहेत. आयोयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून असणारे औषधी उपयोग आहेतच परंतु, इतरही काही उपयोग ह्यात दिसून येतात. मुंबई मधील वनस्पतींचा असा अभ्यास करणार्यांना हि एक पर्वणीच म्हणावी लागेल. कारण ह्यात असणारी झाड सहज रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूला वाढणारी असल्याने आपण सहजच त्यांना बघू शकतो आणि दिलेली माहिती पडताळून सुद्धा पाहू शकतो....!!! झाडांची शास्त्रीय नमाहिती तर आहेच पण झाडाचा फोटो सुद्धा दिल्याने झाड ओळखणं आणखी सोप्पं होऊन जातं .... तसेच झाड कुठे आहे ह्याची सुद्धा सविस्तर माहिती दिल्याने आपण हे पुस्तक घेऊन त्या ठिकाणी पोचून प्रत्यक्ष झाड पाहू शकतो...! एकूण २३ झाडांची माहिती ह्यात आहे. सोप्या आणि सहज सुंदर मराठी भाषेत असणारे हे पुस्तक सर्वानी आपल्या संग्रही  ठेवावे असेच आहे. आज  लेखिका आपल्यात नसल्या तरी  त्यांचे हे मोलाचे कार्य आपल्या सर्वांसाठी कायमच उपयुक्त  ठरेल. 

Comments

Popular posts from this blog

वनस्पतींसंबंधीची पुस्तके

शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर

फुलवा - डॉ. श्रीश क्षीरसागर