वनस्पती आणि त्यांच्यातील संवाद
वनस्पती आणि त्यांच्यातील संवाद
वनस्पती आणि संवाद...... ???? ऐकून चकित झालात ना.... !!!! पण हे खरं आहे . आज तुम्हाला मी त्या संदर्भातच माहिती देत आहे. वनस्पतींबाबत अनेक विषयाचे वाचन केले जाते कारण मी मुळातच वनस्पती विषयातील अध्यापक आहे. ही माहिती एका वन अभ्यासकाच्या अनुभवातून त्याने मांडलेली आहे. वनस्पतींचा अभ्यास करताना त्याने काही घटना पहिल्या आणि त्याची नोंद ठेवून त्याने हा निष्कर्ष काढला की वनस्पती सुद्धा संवाद साधतात. परंतु, हा संवाद आपल्यासारखा खऱ्या संवादातून होत नाही तर त्यांच्या काही ठराविक माध्यमातून केला जातो. आपल्या सर्वाना माहित आहे की संवाद हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. वनस्पती त्यांचा संवाद वास, चव आणि रासायनिक घटकांच्या स्रवण्यातून करतात.
वनस्पतींना कोणाशी , केव्हा आणि कसा संवाद साधायचं हे सुद्धा कळते. वनस्पतींच्या संपर्कात येणाऱ्या कीटक, प्राणी किंवा इतर पक्षी ह्याच्याशी त्यांचा असणारा संवाद प्रत्येकवेळी वेगळा असतो. एखादा किटक वनस्पतीच्या जवळ आला असता त्याच्या लाळेतून वनस्पतीला कळते की हा कीटक उपद्रवी आहे कि उपयोगी आहे . त्यानुसार जर उपद्रवी कीटक असेल तर वनस्पती एक प्रकारच्या वासाचा रासायनिक पदार्थ (द्रव्य)निर्माण करून त्या कीटकाला मारक ठरणाऱ्या, परंतु वनस्पतीला अपाय न करणाऱ्या इतर कीटकांना आकर्षित करत उपद्रवी कीटकांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. परंतु हि प्रक्रिया अतिशय हळू होत असते. तसेच प्राणी जेव्हा वनस्पतीच्या जवळ येतो आणि तिची पाने खाऊ लागतो त्यावेळी त्या प्राण्याच्या लाळेतून वनस्पतीला सिग्नल मिळतो कि हा प्राणी अपायकारक आहे की नाही... जर तो प्राणी अपायकारक असेल तर त्यानुसार प्रतिक्रिया म्ह्णून वनस्पती एक प्रकारच्या वासाचा रासायनिक पदार्थ (द्रव्य)निर्माण करून त्याला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. ह्यातून वनस्पती चांगल्या आणि वाईट वासाचे परीक्षण करू शकतात हे समजल्याचे जाणवते. तसेच अशा प्रकारे दिला जाणारा प्रतिसाद हा प्रत्येक कीटक , प्राणी किंवा पक्ष्याकरता वेगवेगळा आणि unique (अद्वितीय) असतो.
त्याच प्रमाणे, वनस्पती एकमेकांची काळजी सुद्धा घेतात. जंगलात आढळणाऱ्या वनस्पती एकमेकांशी मुळांद्वारे जोडल्या जातातच परंतु, काहीवेळा असे दिसून आले आहे की दूरवर असणाऱ्या आपल्या जातीतील वनस्पतीला वाढण्यासाठी सुद्धा त्या मदत करतात. ह्यात मुळांसोबत soil fungi सुद्धा महत्वाचे आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या 'छत्र्या' हे त्यातील एक उदाहरण. हे fungal घटक आपल्या तंतूंसारख्या भागामुळे मुळांसोबत नेटवर्क तयार करत लांबवर पसरतात. मुळांना माहिती पुरवण्याचे काम करतात आणि त्यांच्यासोबत राहून आपले जीवन जगतात. ह्या नेटवर्कमुळे जंगलातील एखादी दूरवर असणारी वनस्पती सुद्धा अतिशय कठीण काळात, परिस्थितीत तग धरून राहते, आणि काहीवेळा जगते सुद्धा.. वनस्पतींच्या अशा अनेक उदाहरणातून त्या एकमेकांशी विविध माध्यमातून संवाद साधत असल्याचे दिसते. म्हणूनच जंगले आणि झाड वाढवणे गरजेचं आहे. एकटं वाढणारे झाड जास्त काळ जिवंत राहू शकत नाही आणि समूहात वाढणारी झाडे जास्त काळ जगतात. ह्याच्या वाढीतून सुद्धा असेच जाणवते कि वनस्पती सुद्धा मैत्री किंवा संवाद साधतात आणि आपल्यासोबत इतरांचा सुद्धा विचार करत , त्यांना सांभाळत , त्यांची काळजी करत वाढता आणि काहीवेळा त्यांच्यात घट्ट मैत्री सुद्धा जाणवते. ही मैत्री, इतकी घट्ट असते कि काहीवेळा अशी मैत्री असणारी झाड एकत्र मरताना आढळतात. किती अचंबित करणारे आणि अनाकलनीय जग आहे ना वनस्पतींचे???? अशाच आणखी काही गमती जमती पण नक्कीच share करेन आपल्या समूहात ...!!!
ही माहिती वाचनात आल्यावर मला ती सोप्प्या मराठी भाषेत मांडावीशी वाटली त्याचा हा एक प्रयत्न.
संदर्भ:

Comments
Post a Comment