आज आपल्या सर्वाना मी एक छोटीशी माहिती देणार आहे. आपण सगळेच झाडांबाबत जागरूक आहोत किंवा झाडे लावणे त्याची काळजी घेणे ह्याबाबत. ....! ते गरजेचे आहेच पण त्यासोबत आपण आपली ही आवड आपल्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा निर्माण करत आहोत का? ह्याबाबत थोडासा विचार आपण प्रत्येकाने करावा. काय करू शकू आपण हि आवड मुलांमध्ये किंवा पुढच्या पिढीमध्ये निर्माण करण्याकरता....??? ह्या संदर्भात एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते. दरवर्षी, मुंबई पुणे आणि महाराहस्त्रातील इतर काही भागात, तसेच इतर काही राज्यात जसे गुजराथ, कर्नाटक आणि काही देशातही डिसेंबर महिन्यापासून किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विविध फळभाज्या, फुले, वनस्पती (सर्व प्रकारच्या देशी आणि विदेशी) यांचे प्रदर्शन भरवले जाते. त्यात अनेक विविध वनस्पती, फुले फळे, भाज्या बघायला मिळतात. काही ठिकाणी तर रोपवाटिकांचे स्टॉल्स असतात जिथे तुम्हाला अतिशय कमी आणि माफक दरात तुमच्या आवडीची झाडे विकत घेता येतात. मुंबई मध्ये अशी प्रदर्शने नुकतीच झाली. ह्यात अनके संस्था सहभागी होतात. तसेच महानगरपालिकांद्वारे देखील असे उपक्रम राबवले जातात. अशा प्रदर्शनांना आपण आपल्या छोट्या दोस्तांना घेऊन गेलो तर त्यांना हि प्रदर्शने नाकीयच आवडतात आणि नकळत आवड निर्माण होऊ लागते.
यंदा, पहिले होते २४-२६ जानेवारी २०२० ला ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेले असे प्रदर्शन, त्याच सुमारास पुण्यात एम्प्रेस गार्डन मध्ये असेच प्रदर्शन झाले. तसेच मरिन ड्राईव्ह मुंबई इथे हि एक छोटेसे प्रदर्शन आयोजित केले जाते N.C.Shayana ह्यांच्या समूहातर्फे.
त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले प्रदर्शन होते राणी बाग, भायखळा इथे ३१ जानेवरी ते ४फेब्रुवारी २०२०. एरवी हे प्रदर्शन ३ दिवस असते पण यंदा ह्या उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने प्रदर्शन २ दिवस आणखी वाढवले कारण प्रदर्शनाला खूप प्रतिसाद मिळाला....!!!
तिसरे प्रदर्शन नुकतेच पार पडले रुपारेल कॉलेज माटुंगा इथे. ८-९ फेब्रुवारी २०२०. आणि आता पुढील प्रदर्शन असेल नेरुळ, नवी मुंबई इथे . तारखा अजून केलेल्या नाहीत पण साधारण तिसरा शनिवार रविवार असेल. तारखा कळल्या कि समूहावर टाकेनच. ह्या सर्व प्रदर्शनांना मी नेहमीच जाते किंवा त्यांच्या तारखा कधी कळताहेत ह्याकडे माझे डोळे लागलेले असतात....!!! प्रत्येक वर्षी अशा अनेक प्रदर्शनात तुम्ही आपल्या मुलांना, किंवा नातेवाईकांना घेऊन गेलात तर त्यांनाही ते आवडते आणि त्यांना पण हळूहळू झाडे लावण्याबाबत आवड निर्माण होऊ शकते हा माझा अनुभव आहे. कॉलेज शिक्षक असल्याने आणि त्यातही वनस्पती शास्त्र हाच माझा विषय असल्याने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी आवर्जून नेतो. एकाच ठिकाणी इतकी विविधता तुम्हाला पाहायला मिळते आणि हा खऱोखर अतिशय दुर्लभ योग्य आहे असे मला वाटते. तसेच अशा ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन असते, जसे फुलांच्या रांगोळी, छायाचित्रण, वनस्पती ओळखणे, निसर्ग चित्र रेखाटने इत्यादी. गटानुसार आणि वयानुसार त्यांचे आयोजन केले जाते. विविध कार्यशाळा असतात ज्यांचे माफक मूल्य असते किंवा काही ठिकाणी विनामूल्य असतात. त्यामुळे आपल्याला अनेक गोगोष्टींचा लाभ मिळू शकतो, म्हणतात ना एका दगडात दोन पक्षी पण इथे तर अनेक पक्षी ...!!!!
आपल्या शहरात असणाऱ्या अशा प्रदर्शनांना नक्की जात जा आणि आपल्या बच्चे कंपनी ला सुद्धा ह्यात सामील करून घ्या म्हणजे त्यांना सुद्धा झाडांची आवड लहानपणापासून निर्माण होईल ...!!!
Comments
Post a Comment