बहर - डॉ. श्रीश क्षीरसागर
बहर - डॉ. श्रीश क्षीरसागर
आज मी ओळख करून देत आहे डॉ. श्रीश क्षीरसागर यांच्या एका अतिशय सुंदर पुस्तकाची...!!! पुस्तकाचे नाव ' बहर '. नावावरूनच आपल्याला लक्षात येते की हे पुस्तक आपल्याला विविध फुलांच्या बहराबाबत माहिती देणार आहे. लेखकाने ह्या पुस्तकात एकूण १२० झाडांची माहिती देताना त्याचे अतिशय सुंदर फोटो सुद्धा दिले आहेत. हे पुस्तक 'अक्षरमुद्रा प्रकाशन' ह्यांनी प्रकाशित केले आहे. मित्रांसोबत गप्पा मारताना फुललेल्या झाडांबाबत बोलता बोलता जेव्हा लेखकाला जाणवलं कि अनेक वनस्पतींबद्दल अजूनही लोकांना माहिती नाही. आपले राज्यपुष्प कोणते हे सुद्धा जेव्हा अनेकांना माहित नाही , हे पाहिल्यावर लेखकाने असे पुस्तक लिहावे असा विचार केल्याचे म्हंटले आहे त्याच्या मनोगतामध्ये...!!! (आपले महाराष्ट्राचे राज्यपुष्प 'ताम्हण' ह्या वनस्पतीचे आहे, हे मी इथे नमूद करते म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांना ते कळेल). कॅमेरा हातात आल्यावर लेखकाने असे अनेक वनस्पती आणि त्यांच्या बहराचे, फुलांचे अतिशय सुंदरपणे घेतलेले फोटो आपल्याला ह्याही पुस्तकात पाहायला मिळतात आणि नकळत आपण त्या पुस्तकाचे वाचन करता करता गुंग होऊन जातो... आपल्या सभोवताली असणाऱ्या अशा अनेक वनस्पतींची थोडक्यात आणि संदर्भासहित ओळख करून देणारे हे पुस्तक नक्कीच सर्वांच्या संग्रही असावे असे मला वाटते....!!! अशी पुस्तके सहज मिळणार नाहीत पण ती शोधून त्याचा संग्रह करत आपल्या ज्ञानात भर पडत राहावी ह्याकरता असा खटाटोप करायला लावणाऱ्या पुस्तकांपैकी हे एक सुंदर पुस्तक...!!!


Comments
Post a Comment