फुलवा - डॉ. श्रीश क्षीरसागर

आज मी ओळख करून देत आहे डॉ. श्रीश क्षीरसागर यांच्या आणखी एका अतिशय सुंदर पुस्तकाची...!!! 
पुस्तकाचे नाव ' फुलवा '. 

          हे पुस्तक आपल्याला विविध फुलझाडांची माहिती  देणारे आहे. लेखकाने ह्या पुस्तकात एकूण ४७ फुल

झाडांची माहिती देताना त्याचे  सुंदर फोटो सुद्धा दिले आहेत. हे पुस्तक 'सृजन  प्रकाशन, नाशिक '  ह्यांनी प्रकाशित केले आहे. लेखकाने २०००४ साली लोकसत्ता मध्ये फुलांवर सदर लिहिण्यास सुरवात केली आणि त्यातील लेखमाला लोकांच्या पसंतीस उतरली. हीच लेखमाला फुलवा नावाने लिहिली गेली आणि त्याचेच  हे पुस्तक...!!! अनकेविध फुलांची माहिती लेखकाने आपल्या सहज सुंदर भाषेत देताना अनेक काव्यपंक्तीचा चपखल वापर केलेला आढळतो. पेशाने औषधी वैद्य असणाऱ्या लेखकाला, वनस्पतींचे सखोल ज्ञान आहेच पण त्यासोबत त्यांचे मराठी आणि संस्कृत भाषेतील प्रभुत्व सुद्धा आपल्याला लेखातून जाणवते. लालित्यपूर्ण भाषेतून माहिती देताना त्यातली शास्त्रीय माहिती सुद्धा अतिशय सोप्प्या आणि समजेल अशा भाषेत लेखकाने मांडली आहे, जेणेकरून हे पुस्तक फक्त वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्याऱ्यांनाच नाही तर सगळ्यांनाच वाचायला आवडेल....!!! त्याच्या लेखातून सतत जाणवत राहते ती त्यांची निसर्गाबद्दलची तळमळ,  निसर्गसंवर्धनाची कळकळ आणि जाण ...!!
                 थोडक्यात सांगायचे तर, साहित्य, विज्ञान आणि कला यांचा सुरेख संगम असलेलं हे पुस्तक आपल्या शाळा, कॉलेज आणि मराठी वाचकांच्या घराघरात असावे असेच आहे...!!   अशा पुस्तकातून माहिती तर मिळतेच परंतु, पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी सामान्य माणसाने अशी झाडे वाचवली  पाहिजेत,  त्यांचा अभ्यास आणि ओळख करून घेतली पाहिजे  ह्या विचाराने जनजागृती  करण्यास अशी पुस्तके मोलाचे काम करतात असे मला वाटते. 



Comments

Popular posts from this blog

वनस्पतींसंबंधीची पुस्तके

शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर